text
stringlengths
0
147
पारखी होऊन जाहली अयोध्यापुरी राया हरिश्चंद्राशी
रोहिदास, तारामती राणी जाले त्रिवर्ग वनवासी ... "
सगनभाऊ नावाच्या एका मुसलमान शाहिरानेही बाजीरावांची स्तुती केली आहे. तो
म्हणतो-
"भोळा माझा सांभ अहो निर्मळ काया,
त्याच्या पदरचे चार उठले बसले बुडवाया
निमकहरामी झाले लक्षपती धन खाया
सात ताल हवेलीचा ज्यांनी ढासळला पाया
शिकारखाने रमणे ब्राह्मण मोकलती धाया,
एक्याप्राण्यावाचून शहर करीती गायावाया,
थान पितें बालक लोटून दिलेस रघुराया
मी अनाथ माऊली कशी नाही आली तुज माया ... "
मग आता शाहिरीवर विश्वास ठेवायचा म्हटलं तर आपण बाजीरावांना देवाचीच उपमा
का देऊ नये? शाहिरी/पोवाडे ही एक काव्यमय बखर असते. त्यातली सगळीच माहिती
चुकीची असते असं नाही परंतु तीवर किती विश्वास ठेवावा यालाही काही मर्यादा असतातच.
त्यामुळेच शाहिरांच्या 'कथना'वरून बाजीरावांना स्त्रीलंपट म्हणणे हे अत्यंत चुकीचे आहे.
'पेशवाईच्या' आणि 'पेशव्यांच्या' बाबतीत असणाऱ्या, गेली अनेक वर्षे ज्या गैरसमजुती
होत्या, जे गैरसमज जाणता-अजाणता पसरलेले होते ते दूर करण्याचा हा एक लहानसा
<<<
प्रयत्न होता. १८१८ पासून या क्षणापर्यंत ज्या वाईट नजरेतून पेशव्यांकडे जातं त्या
नजरेला काही गोष्टी आणाव्यात हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. कोणाच्याही घराण्याची
अथवा व्यक्तीची बदनामी करण्याचा कसलाही हेतू नाही. बहुत काय लिहावे?
<<<
शाहूछत्रपतींची स्वदस्तुराची मृत्यूपत्रे
मार्गशीर्ष वद्य २, शके १६७१ म्हणजेच दि. १४ डिसेंबर १७४९ रोजी छत्रपती
शाहूमहाराजांनी स्वहस्ताक्षरात दोन याद्या केल्या. या दोन याद्या म्हणजे शाहूछत्रपतींची
स्वदस्तुराची मृत्यूपत्रेच आहेत. या मृत्यूपत्रानुसार शाहूछत्रपतींनी राज्यकारभाराची
जबाबदारी नानासाहेबांकडे सोपवली. शाहूराजे बाळाजी पंडित प्रधान उर्फ थोरल्या
नानासाहेबांना काय म्हणतात, त्याचा दोन्हीही याद्यांमधील सारांश असा- "राजमान्य राजेश्री
बाळाजी पंडित प्रधान यांस आज्ञा केली जे सगळ्यांना आज्ञा केली पण त्यांच्या दैवी नाही,
तेव्हा तुम्ही फौज सांभाळून, राज्यकारभार चालवायला हवा तर त्याकरीता गादीवर वंश
बसवणे, पण कोल्हापूरच्या गादीपैकी न घेणे! चिटणीस आमचे विश्वासू, त्यांना सर्व सांगितले
आहे. राज्यकारभार तुम्ही चालवाल हा भरवसा स्वामींस (शाहूराजांना) आहे.
तुमच्याविषयीची खातरजमा चिटणीसांनी अढळ केली. तुमच्या मस्तकी आमचा वरदहस्त
आहे. जो वंश होईल तो तुमचे प्रधानपद चालवेलच, तुमची घालमेल करणार नाही, त्यात
अंतर करेल तर त्यास शपथ असे. त्याच्या आज्ञेत चालून राज्य राखणे."
छत्रपती शाहूमहाराज मृत्यूपत्र यादी क्र. १, यादी क्र. २ स्रोत व सौजन्य मराठी
रियासत, मध्य विभाग २ (सन १९२१ ची आवृत्ती)
<<<
'रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ
ग्रेट ब्रिटन अॅण्ड आयर्लंड' येथील कागद
<<<
पेशव्यांचा सर्वधर्मसमभाव
श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या अंतःकाळची स्थिती एका समकालीन बखरवजा कागदात
नमूद आहे. इंग्लंडच्या Royal Asiatic Society च्या संग्रहात असलेल्या या
कागदात नानासाहेबांचे, किंबहुना यानिमित्ताने साऱ्याच पेशव्यांची
अशाकरिता की यामध्ये नानासाहेब आपल्यावर अप्पांनी हे संस्कार केल्याचे लिहितात, तसेच
संस्कार पुढल्या पिढ्यांवरही झाले. याच कागदात भट (पेशवे)- पुरंदरे यांच्यातील घरोब्याचे
संबंध स्पष्ट होतात. भट घराण्याच्या सुरुवातीपासून ते पेशवाईच्या अखेरपर्यंत पुरंदरे घराणे
पेशव्यांच्या कायम सोबत राहिले, याचे विस्मरण पेशव्यांना कधीही झाले नाही. येथे
अंतःसमयी नानासाहेब आपले धाकटे बंधू रघुनाथरावांना उपदेश करत आहेत. वर दिलेल्या
दोन्ही कागदांमध्ये असलेल्या मजकुराचा सारांश असा-
"मराठे, मोंगल, पठाण, राजपुत-रांगडे, ब्राह्मण, प्रभू, शेणवी इत्यादी जे जे सरदार या
दौलतीशी बांधील आहेत आणि ज्यांनी आमच्यासोबत जाती-जमातीनिशी या राज्यासाठी
कष्ट केले आहेत, त्यांचे वंशपरंपरागत आम्ही चालवत आलो, तसेच तुम्हीही चालवावे. या
दौलतीत देशस्थ ब्राह्मण अंबाजीपंत पुरंदरे आणि त्यांचे पुत्र महादोबा हे पूर्वीपासून फार
मेहनतीने आपल्यासोबत आहेत, त्यांचे आणि त्यांच्या वंशाचे पहावे. त्यांना परके समजू नये.
देशस्थ, कोकणस्थ, प्रभू, शेणवी इत्यादींचा द्वेष बाळगू नये. ही दौलत सगळ्यांमुळे आहे.
सगळ्यांची मने सांभाळावीत. तिर्थरूप चिमाजीअप्पांची आज्ञा आहे की, मनुष्याला राजी
राखल्याने दौलतीचे काही नुकसान होत नाही. आम्ही जातो म्हणून उदास होऊ नये. ज्याचे
त्याचे व्यवसाय वगैरे सांभाळावे. इतरांचे द्रव्य वा त्यांची संपत्ती वगैरे अन्यायाने घेऊ नये.
अन्याय होत असल्यास कडक शिक्षा करावी. धर्मनीति सोडू नये. गोब्राह्मण- प्रजासंरक्षण
कोणावरही अन्याय न करता यथान्याये करावे. हिंदू-मुसलमान आपापली कामे चोख करीत
असल्यास कोणाचाही द्वेष करू नये. ज्याचा जो धर्म आहे, ज्याचे जे दैवत आहे, त्याविषयी
द्वेषी मन असू नये."